सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

  • 0253 2305233
  • 09075011222

Latest News

Advertisement

पोलीस आयुक्त, नाशिक शहर या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट-ब  व विधी अधिकारी यांची रिक्त पदे पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात 

दसरा वाहतूक मार्ग अधिसूचना –

नवरात्री उत्सव अधिसूचना –

मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल औरंगाबादकडून धुळे बाजुकडे जाणारी अवजड वाहने जत्रा हॉटेलमार्गे धुळ्याकडे जातील

गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मूक मोर्चाची चाललेली जय्यत तयारी लक्षात घेऊन शनिवारी शहरातील अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. तपोवन कमान ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या मोर्चाच्या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त शहरातील जवळपास दहा ठिकाणे ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. मोर्चात येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या भागात वाहनतळ निश्चित करून पुढे त्यांना पायी मार्गस्थ व्हावे लागणार आहे.

नाशिकच्या मोर्चावेळी शहरात प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी शनिवारच्या वाहतूक नियोजनासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मोर्चातील वाहने वगळून इतर वाहने व अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची निश्चिती करण्यात आली आहे. औरंगाबाद पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने नांदुरनाका जेलरोड बिटकोमार्गे नाशिकरोडकडून पुण्याकडे आणि नाशिकरोड सम्राट कॉर्नर डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा राजीवनगरमार्गे पाथर्डी फाटय़ाकडे जातील. औरंगाबादकडून धुळे बाजुकडे जाणारी अवजड वाहने जत्रा हॉटेलमार्गे धुळ्याकडे जातील. धुळ्याकडून पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने जत्रा हॉटेलमार्गे नांदूरनाका, जेलरोड, बिटको मार्गे पुण्याकडे आणि नाशिकरोडच्या सम्राट कॉर्नर डावीकडे वळून डीजीपीनगर मार्गे वडाळा राजीवनगरमार्गे पाथर्डी फाटा अशी मुंबईकडे मार्गस्थ होतील. धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने क. का. वाघ महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलावरून जातील. दिंडोरीकडून धुळे, औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहने आरटीओ कॉर्नरमार्गे रासबिहारी मार्गे धुळ्याकडे जातील. पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेलमार्गे नांदुरनाक्यावरून औरंगाबादकडे व जेलरोड, बिटको चौकातून पुण्याकडे जातील. बिटकोमार्गे विहितगाव उजवीकडे वळून वडनेर गेटमार्गे पाथर्डी फाटा अथवा नाशिकरोड मधून डीजीपीनगर, वडाळा, राजीवनगरमार्गे मुंबईकडे जातील. मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहने उड्डाण पुलाचा वापर करतील. पुण्याकडे जाणारी वाहने पाथर्डी फाटा, वडनेरगेट, विहीतगाव बिटको चौक मार्गे पुण्याकडे जातील. पेठकडून येणारी वाहनांसाठी आरटीओ कॉर्नरकडून राऊ हॉटेल, म्हसरूळ, रासबिहारी मार्गे तर मुंबईकडे जाणारी वाहने जुना गंगापूर नाका सिग्नल, जेहान सर्कल, बारदान फाटा, अंबड टी पॉइंट, गरवारे मार्गे मुंबईकडे जातील.

शहरातील वाहनांसाठी पर्यायी मार्ग

* आडगाव, पंचवटी विभागातील वाहनधारकांना अमृतधाम चौफुली येथून तारवालानगर, शरदचंद्र बाजार समिती, मखमलाबाद गाव, ड्रीम कॅसल, गंगापूर नाका सिग्नल मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. नाशिकरोडकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेल, नांदुरनाका, जेलरोडमार्गे इच्छीतस्थळी जातील.

* अंबड, इंदिरानगर परिसरातील वाहने साईनाथनगर, जॉगिंग ट्रॅकमार्गे सिटी सेंटर मॉलवरून इतरत्र जातील

*  मोर्चाच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करता येणार नाही.

मोर्चेकऱ्यांसाठीचे वाहनतळ

पेठ, हरसूल, गिरणारे व मखमलाबादकडून मोर्चासाठी येणाऱ्यांना आपली वाहने आरटीओ कार्यालयासमोरील शरदचंद्र पवार बाजार समिती हे वाहनतळ राहील. दिंडोरी, कळवणकडून येणाऱ्यांची वाहने दिंडोरी रस्त्यावरील बाजार समिती व मेरीची जागा. मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, पिंपळगाव ओझरमार्गे येणारी वाहतूक ओझरमार्गे मोर्चासाठी येणाऱ्यांना रासबिहारी स्कूल येथून डावीकडे वळून निलगिरी बाग येथील जागा. येवला, नांदगाव, लासलगाव, निफाड बाजूकडून येणारी वाहने जयशंकर फेस्टिव्हल (जेजूरकर मळा). सिन्नर, भगूर, देवळाली, नाशिकरोड बाजूकडील येणाऱ्या वाहनांसाठी फेम थिएटरपासून ड्रिमसिटी चौकातून वळून तपोवन रस्त्याने गोदावरीच्या दक्षिणेकडील मैदानावर. इगतपुरी, घोटीकडून मुंबई-आग्रा महामार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी तपोवन रस्त्यावरील आठवण लॉन्स. त्र्यंबकेश्वरकडून येणारी वाहने द्वारका चौकातून तपोवनातील आठवण लॉन्सच्या वाहनतळ.

मोर्चा मार्गावर  ‘नो व्हेईकल झोन’

शनिवारी मोर्चा मार्गावरील दहा ठिकाणे ‘नो व्हईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट, निमाणी बसस्थानका जवळील परिसर, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सीबीएस परिसर, टिळकवाडी, तिडके कॉलनी, मुंबई नाका टॅक्सीस्टँड आणि सारडा सर्कल या परिसरात कोणतेही वाहन नेण्यास प्रतिबंध राहणार आहे.

सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांविरोधात मोहीम

वाहनचालकांची वाढती मुजोरी.. त्यातून उद्भवणारे वाद.. निर्माण होणारी वाहतूक कोंडी..  वारंवार होणारे नियमांचे उल्लंघन.. या संदर्भात शहर वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून धडक कारवाईचे सत्र आरंभले आहे. आता चारचाकी वाहन चालविताना पट्टा न वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

शहरातील मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड यासह अनेक ठिकाणे निश्चित करत पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात वाहन व वाहनचालकांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी, चार चाकी वाहन चालवितांना सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवितांना भ्रमणध्वनीवर बोलणे, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर गाडी उभी करणे यासह इतर  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असतांना काही वाहनधारक पोलिसांशी वाद घालत असल्याचे पहावयास मिळते. गुरूवारी ही कारवाई सकाळच्या सत्रात व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.

यावेळी मुंबई नाका चौफुलीवरील सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनधारकाला पोलिसांनी अडविले. संबंधिताने पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला. उभयतांच्या वादात मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. जवळपास १५ ते २० मिनिटे हा वाद सुरू होता. पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत यावर पडदा टाकला.

कारवाई विषयी माहिती नाही, वाहतूक पोलिसांकडून वारंवार या स्वरुपाच्या कारवाईला तोंड द्यावे लागते, अशी वाहनधारकांची तक्रार आहे. एका वाहनधारकाला रोखल्यानंतर संबंधिताने एका नगरसेवकाला भ्रमणध्वनी लावला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तो स्वीकारला नाही. यामुळे संतापलेल्या नगरसेवकाने थेट या ठिकाणी धाव घेतली. दंड न भरता संबंधिताने हे वाहन नेल्याचे खुद्द कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कारवाईत राजकीय मंडळींकडून या पध्दतीने अडथळे आणले जात असल्याचे अधोरेखीत झाले.

मराठा मोर्चातील वाहतूक नियोजनासाठी ही मोहीम दुपारी काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. सायंकाळी चार नंतर पुन्हा मोहीम सुरू झाली. विविध ठिकाणी राबविलेल्या मोहिमेत १०० हून अधिक चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई वारंवार केली जाणार असल्याचे या विभागाने म्हटले आहे.

दिनांक २४/९/२०१६ रोजी आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चा बाबत वाहतूक नियत्रंण अधिसुचना

दिनांक २४/९/२०१६ रोजी मराठा रॅली मूक मोर्चा मार्ग

शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन रात्री उशिरा प्रयन्त कारवाई

नाशिक

शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपेरेशन रात्री उशिरा प्रयन्त कारवाई गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी शहर आणि परिसरातील काही भागात अचानक कोम्बिंग ऑपेरेशन राबवण्यात आले. परिमंडळ १ व २ मध्ये मा. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शना खाली कारवाई सुरु करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत ही कारवाई सुरु होती गणेशोत्सव, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर हि कारवाई करण्यात आली परिमंडळ १ व २ मध्ये पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील , सहाय्यक  पोलीस  आयुक्त ड्रॉ राजू भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्तसचिन  सचिन गोरे, अतुल झेंडे, विजय कुमार चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी कोम्बिंग ऑपेरेशन कारवाई मध्ये सहभाग घेतला

मा. पोलीस आयुक्त श्री रविंदकुमार सिंगल यांचे नागरिकांना आव्हान

बेशिस्तदुचाकी चालकांवर नाशिक रोडला कारवाई

ø;